८३ महसुली गावातून लोकसहभागातून उद्या होणार श्रमदानातून स्वच्छता

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कल्याण पंचायत समितीच्या ४६ ग्रामपंचायती व या अंतर्गत येणाऱ्या ८३ महसुली गावातून लोकसहभागातून श्रमदान आणि स्वच्छता करण्यात येणार आहे. याबाबतचे मार्गदर्शन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कर्मचारी यांना नुकतेच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती दिनी देशभर महाश्रमदान स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत व या अंतर्गत ८३ महसुली गावात स्वच्छता हि सेवा अभियानांतर्गत लोकसहभागातून श्रमदान व यातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, सकाळी १० ते ११ या वेळेत, शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई, तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतचे मार्गदर्शन व सूचना कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात कर्मचाऱ्यांना दिल्या तसेच हे महाश्रमदान अभिमान यशस्वी करण्याचे अवाहन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम