गॅस गळती दुर्घटनेत पंजाबमध्ये ९ जणांचा होरपळून मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  ग्यासपुरा परिसरात गॅस गळतीमध्ये ६ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हि घटना पंजाबमधील लुधियानामध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखलं झाले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोयल मिल्क प्लांट’ नावाच्या कारखान्यामध्ये गॅस गळती झाली आहे. या कारखान्यात बड्या कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थ स्टोअर केले जातात. त्यानंतर त्याचा पुढे पुरवठा केला जातो. प्राथमिक माहितीनुसार दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसची गळती झाली आहे. गॅस गळतीमुळे कारखान्यापासून 300 मीटर परिघात राहणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. पोलीस सध्या कारखान्याजवळ असून गॅस गळतीचे कारण शोधले जात आहे. पोलिसांनी व्यवस्थापकांशीही संपर्क साधला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम