पवार गटातील ९५ टक्के आमदार माघारी येणार ;रोहित पवार !
दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करणारे जवळपास 95 टक्के आमदार स्वगृही परत येतील, असा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तथा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवारांसोबत नेमके किती आमदार गेले याची चर्चा सातत्याने होते. पण पुढील 10 ते 15 दिवसांत पाहा काय होते, असे सूचक विधान त्यांनी यासंबंधी केले आहे.
अजित पवारांच्या बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे 2 उभे गट पडलेत. त्यात राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या गटात जाणे पसंत केले आहे. यापैकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. पण आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांसोबतच राहण्यास प्राधान्य दिले आहे. ते विचारधारेच्या मुद्यावरून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्ला चढवत आहेत. आता त्यांनी बंडखोर आमदारांपैकी 90 ते 95 टक्के आमदार परत येतील, असा दावा केला आहे.
अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले? याची सातत्याने चर्चा सुरू आहे. पण पुढील 10 ते 15 दिवसांत काय होते ते तुम्ही पहाच, असे सूचक विधान रोहित पवार यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, मला एक कळत नाही की, 36 चा आकडा आपल्याला कशाला पाहिजे. कारण, पक्षावर दावा सांगण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागत नाही. तर, गटाला मेजॉरिटी म्हणजे 2/3 बहुमतासाठी 36 आमदारांची गरज असल्याचे सांगितले जाते. पण दोन तृतीयांश आमदारांची गरज ही या आमदारांचे दुसऱ्या पक्षात विलनीकरण होण्यासाठी लागत असते. मग, त्या आमदारांची भूमिका अशी आहे का, हा गट घ्यायचा आणि भाजपात विलीन व्हायचे? अशी भूमिका असेल तर ती आपल्याला नंतर कळेल. पण ही भूमिका आमदारांच्या लक्षात आली, तर माझ्या मते, 90 ते 95 टक्के आमदार परत आल्याचे दिसून येईल, असे गणित त्यांनी यावेळी समजावून सांगितले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम