जनतेला मोठा फटका : पालेभाज्या महागल्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ | देशात महागाईचा डोंगर मोठा होत असतांना आता सर्वसामान्यांना देखील आहारात मोठा फटका बसणार आहे. मागच्या आठवड्यातील मुसळधार पावसाचा फटका मुंबईमध्ये भाजीपाल्यांच्या दरांवर झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही ठिकाणी महत्त्वाच्या बाजारात काही भाजीपाल्यांचे दर चांगलेचं वाढले आहेत.

काही भाजीपाल्यांचे दर कमी झाले आहेत. मागच्या महिन्यापासून संपूर्ण देशात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेअसल्याचे पाहायला मिळाले आहे. २०० रुपयाच्या वरती जाऊन टोमॅटो विकले जात आहेत. मुंबईत सुध्दा भाजीपाल्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर चालवणं अवघड झालं आहे. लसून मागच्या आठवड्यात १०० रुपये किलो दराने बाजारात विकला जात होता. सध्या लसणाचा दर 180 ते 200 रुपये किलो झाला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर यापुढे देखील अशा पद्धतीने दर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

भाज्यांचे दर खालीलप्रमाणे
टोमॅटो – 150 रुपये पहिले 110 ते 120
भेंडी – 60 रुपये ते 70 पहिले 80
कारले – 60 रुपये पहिले 70
शिमला मिरची – 60 रुपये पहिले 80
कोबी – 40 रूपये पहिले 50 ते 60
फ्लावर – 60 रुपये पहिला 60
दुधी – 50 पहिले 60
मिरची – 80 पहिले 60
बिट – 40 स्थिर
भोपळा – 30 स्थिर

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम