![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2023/08/Batmidar-14-4.jpg)
सीमा हैदरनंतर पाकिस्तानची तरुणी बनली राजस्थानची सून !
बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ | जगभरात खळबळ होणारी लव्हस्टोरी भारतात घडली आहे ती म्हणजे सीमा हैदरने थेट पाकिस्तानातून येत भारत आपल्या प्रियकरासोबत लग्न केले आहे. पण त्यानंतर भारतातून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली अंजू देखील सध्या चर्चेत असतांना एक पाकिस्तानी तरुणीची चर्चा सुरू झाली आहे. या तरुणीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोधपूरमधील तरुणाशी निकाह केला. जोधपूरचा रहिवासी असलेला मोहम्मद अरबाज आणि पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असलेल्या अमिना यांनी ऑनलाइन निकाह केला. बुधवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे त्यांचा निकाह पार पडला. जोधपूर येथे राहणारे कॉन्ट्रॅक्टर मोहम्मद अफजल यांचा धाकटा मुलगा अरबाज यानं अमीना या पाकिस्तानी मुलीशी निकाह केला. हा खास ऑनलाइन निकाह बुधवारी पार पडला.
आधी हा सोहळा कराचीमध्ये पार पडणार होता. परंतु व्हिसा न मिळाल्याने त्यांनी ऑनलाइन निकाह करण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातंय. या अनोख्या सोहळ्यात मोहम्मद अरबाज आणि अमीना यांच्या कुटुंबीयांनी निकाहचे सर्व विधी ऑनलाइन पार पाडले. दोन्ही कुटुंबंही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडली गेली. कार्यक्रमस्थळी लॅपटॉपसह दोन मोठे एलईडी स्क्रीनही लावण्यात आले होते.
वधू लवकरच पाकिस्तानातून जोधपूरला येणार असल्याची माहिती वराचे वडील मोहम्मद अफजल यांनी दिली. आमचेही तिथे नातेवाईकही आहेत. आता आम्ही व्हिसाची तयारी करू. ऑनलाइन विवाह आमच्यासारख्या सामान्य कुटुंबांसाठी सोयीस्कर आहे. त्यासाठी खर्चही कमी येतो. जर आपण निकाहनामासह व्हिसासाठी अर्ज केला तर तो सहज उपलब्ध होईल, असंही ते म्हणाले.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम