निवडणुकीपूर्वी होणार पेट्रोलसह डीझेलच्या दरात मोठी कपात !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | देशात गेल्या अनेक वर्षापासून पेट्रोलसह डीझेलच्या दरात नियमित वाढ होत असतांना आगामी काळात देशातील अनेक ठिकाणी निवडणुक जाहीर होणार असून यासाठी देशातील नागरिकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत देशातील सरकार आहे. भारतीय अधिकारी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एकूण 1 लाख कोटी रुपये कमी करण्याचा विचार करत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अन्न आणि इंधनाच्या किंमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हा पैसा वापरला जाईल.

किंमती कमी करण्याच्या प्रयत्नात अर्थसंकल्पीय तुटीचे जे लक्ष आहे त्यात बदल होऊ नये म्हणून मंत्रालयांच्या बजेटमधून ही कपात केली जात आहे.या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, ‘येत्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर निर्णय घेतील, ज्याअंतर्गत स्थानिक पेट्रोल विक्रीवरील कर कमी केला जाईल, तसेच स्वयंपाकाचे तेल आणि गव्हाच्या आयातीवरील शुल्क कमी केले जाईल.’ मागील वर्षी देखील, सरकारने 26 बिलियन डॉलरची अशीच योजना आणली होती, ज्याचा उद्देश किंमती नियंत्रणात ठेवणे हा होता.

15 ऑगस्टच्या भाषणातही पंतप्रधान मोदींनी महागाईशी लढा देण्याविषयी सांगितले, जी 15 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे. यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. भारत हा असा देश आहे, जिथे कांदे आणि टोमॅटोच्या किंमतींचा निवडणुकीवर मोठा परिणाम होत असतो, पुढच्या लोकसभा निवडणुकीला काही काळच उरला आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील. अर्थसंकल्पाचे पुनर्वितरण ही भारतात नवीन गोष्ट नाही. परंतु आरबीआयने जास्त लाभांश देय केल्यामुळे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत वाढत्या कर संकलनामुळे, सरकारला एक लाख कोटी रुपये मिळू शकतात. हा आकडा मार्च 2024 पर्यंत केलेल्या अर्थसंकल्पाच्या 2% आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम