‘गदर २’ पोहचला २०० कोटीच्या घरात !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | नुकताच ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर येताच चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच दिवशी 40 कोटींचे खाते उघडले. यानंतर पहिल्या वीकेंडलाच हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला. तर तो आता थेट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून देशभर अनेक चाहत्यांनी चित्रपटगृहात गदर २ चा धुमाकूळ घातला आहे.

गदर 2 ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ४३ कोटींचा निव्वळ व्यवसाय केला. त्याच वेळी, रविवारी कलेक्शन ५० कोटींच्या पुढे गेले. यासह गदर 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 134.58 कोटी कमावले. बॉक्स ऑफिसवर बहुतेक चित्रपट सोमवारच्या कसोटीत फसले. तर गदर २ ने भरघोस कमाई केली. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण झाली आणि 38.70 कोटी कमावले. आता गदर 2 च्या स्वातंत्र्यदिनी व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली.

15 ऑगस्टला सनी देओलच्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. मंगळवारी गदर 2 ने देशभरात सुमारे 55.5 कोटी (सुरुवातीचे आकडे) गोळा केले, असे सकनिल्‍कने सांगितले. यासह, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अवघ्या पाच दिवसांत 229 कोटींचा आजीवन निव्वळ व्यवसाय केला आहे. गदर 2 चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे, ज्यांनी 22 वर्षांपूर्वी गदर देखील बनवला होता. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. उत्कर्षने गदर २ मध्ये सनी देओलच्या मुलाची भूमिका केली आहे. त्यांच्याशिवाय सिमरत कौर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम