राऊतांना मोठा दिलासा : ‘या’ प्रकरणातील सुनावणी तहकूब !
दै. बातमीदार । २८ जून २०२३ । राज्यातील उद्धव ठाकरेंच्या गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह प्रविण राऊत यांच्यावर गोरेगाव येथील पत्रा चाळमधील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) उपस्थित संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती.
दरम्यान संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. ईडीच्या याचिकेवरील सुनावणी आता 11 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने हाय कोर्टात धाव घेतली होती. संजय राऊत, प्रविण राऊत यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने केली होती. 2010 मध्ये, प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीतील 25 टक्के हिस्सा एचडीआयएलला विकला. त्यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डरांना विकण्यात आले. प्रवीण राऊत यांना एचडीआयएल समूहाकडून 112 कोटी रुपये मिळाले होते, त्यापैकी 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते. पत्रा चाळमधील रहिवाशांची घरे पाडून त्यांना बेघर करण्यात आले. त्यांना वेळेवर सदनिका देण्यात आल्या नाहीत. बिल्डरांनी भाडेकरूंना भाडे देणेही बंद केले, अस आरोप ईडीने केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम