बॉलीवूडला मोठा धक्का : प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ औग्स्त२०२३ | देशातील बॉलीवूड क्षेत्रात गेल्या काही महिन्यापासून एकापाठोपाठ एक धक्के बसत असतांना पुन्हा एकदा साऊथ सिनेमाला मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्दीकी यांनी ८ ला रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराच्या झटक्याने सिद्दिकी यांचं निधन झालंय. सिद्दीकीने सलमान खानचा हिंदी चित्रपट ‘बॉडीगार्ड’ दिग्दर्शित केला होता. मिडीया वृत्तानुसार, सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्दीकी यांना घाईघाईने कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्दीकी यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सकाळी 9 ते 11.30 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी 6 वाजता सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सिद्दीकीने ‘बॉडीगार्ड’चा हिंदी रिमेक दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय करीना कपूर सुद्धा होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम