उद्धव ठाकरेंनी तोडली युती ; पंतप्रधान मोदींचा घणाघात !

बातमी शेअर करा...

बातमीदा | ९ ऑगस्ट २०२३ | दि.८ रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीए खासदारांच्या बैठकीला मोदींनी मार्गदर्शन केले असून महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपने नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचीही मोदींनी स्तुती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती, त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. पण ठाकरेंना सत्तेत पण राहायचे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत. बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेतून जाणार नाही. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचे आहे, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा उपस्थित होते. शिंदे गट व अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते. शरद पवार, प्रणव मुखर्जी यांची स्तुती करताना मोदी म्हणाले, शरद पवार, प्रणव मुखर्जी हे दिग्गज नेते काँग्रेससोबत आहेत. पण, काँग्रेसच्या स्वार्थामुळे या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी काँग्रेसने अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले. काँग्रेसचा हा अहंकारीपणा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम