निकालापूर्वीच तांबेना मोठा धक्का : ट्विट करून दिली माहिती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ फेब्रुवारी २०२३ । राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट व्हायरल केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे.

माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे. अशा आशयाचे ट्विट तांबे यांनी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात झाला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम