कियारा बांधणार “या” दिवशी अभिनेत्यासोबत लग्नगाठ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ फेब्रुवारी २०२३ । ‘शेरशाह’ चित्रपटातील सर्वांची लाडकी जोडी अर्थात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

काय सांगता : ३२ इंच टीव्ही फक्त ५ हजारात !

सिद्धार्थ आणि कियारा यांचा विविहसोहळा ८ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथे पार पडणार आहे. ५ तारखेपासून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होणार आहे. त्यांना लग्नाला १०० ते १२५ लोकांना आमंत्रण दिले आहे. यामध्ये जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पाहुण्यांना राहण्यासाठी जवळपास ८४ लग्झरी रुम बूक करण्यात आल्या आहेत.

नोकरीसोबत करा “हा” व्यवसाय व कमवा लाखो रुपये !

गेल्या काही दिवसांपासून कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. आता त्यांचा विवाहसोहळा ८ फेब्रुवारीला पार पडणार असल्याचे समोर आले आहे. त्यापूर्वी लग्नाआधीचे विधी होणार आहेत. त्यात संगीत, मेहंदी, हळदीचा समावेश आहे. ४ फेब्रुवारीपासून अनेकजण मुंबईतून जैसलमेरला जाणार आहेत.

फक्त 99 रुपयात 28 दिवस नेट आणि कॉल जिओ देखील फेल !

यापूर्वी कियाराचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या लग्नासाठी कोणत्या डिझायनरचा लेहेंगा परिधान करणार आहे, याचा खुलासा झाला होता. कियारा अडवाणी या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि तिचा खास मित्र मनीष मल्होत्रासोबत दिसली. दोघांचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. कियारा आणि मनीषला एकत्र पाहून लग्नाच्या बातम्यांना अधिकच हवा मिळाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम