स्टार क्रिकेटर रिषभ पंतच्या तब्येतीची मोठी अपडेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मोठा अपघात झाला होता त्यानंतर त्याला उत्तराखंडमधील डेहराडून येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पंतवर मुंबईत उपचार सुरू होते. लक्षणीय बाब म्हणजे पंतची रिकव्हरी जलद गतीने सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रिषभने फोटो पोस्ट करत त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले. आता यावर उर्वशीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला नुकतीच मुंबई विमानतळावर दाखल झाली. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली. दरम्यान पापाराझींनी तिला विचारले, ‘उर्वशी मॅडम इन्स्टावर फोटो पाहिले का?’ यावर उर्वशी विचारते, ‘कोणते फोटो?’ पापाराझी म्हणतात, रिषभ पंतने फोटो पोस्ट केले आहेत, सर आता बरे होत आहेत. यावर उर्वशी म्हणत, ‘देशाला त्याचा अभिमान वाटतो.’ हे ऐकून पापाराझी म्हणतात ‘नक्कीच आम्ही प्रार्थना करतो त्याच्यासाठी.’ उर्वशी म्हणते, मी देखील करते.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम