निळ्या बॅगमध्ये ठेवलाय बॉम्ब ; विमानतळावर धावपळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३ | मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ (टी २)वर एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा इशारा देणारा निनावी कॉल शनिवारी आला. या कॉलमुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब शोधमोहीम राबवली. मात्र, विमानतळ परिसरात काहीही संशयास्पद आढळले नाही. सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम आहे.

अशा उत्सवाच्या वातावरणात बॉम्ब असल्याच्या निनावी कॉलमुळे विमानतळ, तसेच आसपासच्या ठिकाणांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, सहारा पोलिस, गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके कॉलरचा शोध घेत आहेत.

शनिवारी संध्याकाळी ६ वाजता टी- येथील अधिकाऱ्यांना २ विमानतळावरील निळ्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष आणि विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थापकांना कॉलची माहिती दिली. त्यानंतर, स्थानिक सहारा पोलिस, दहशतवादविरोधी सेलच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाला भेट दिली. श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने विमानतळावरील संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांना ती बॅग किंवा स्फोटके आढळली नाहीत. त्यामुळे तो कॉल निव्वळ खोडसाळपणा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम