…म्हणून २० हजार कोटींची संसदेची नवी इमारत ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३ | सध्याच्या संसदेत १० वर्षांपेक्षा अधिक काळ कोणाचाही सत्ता टिकलेली नाही. त्यामुळे नवी संसद बांधा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्योतिषाने दिल्याने २० हजार कोटींची संसदेची नवी इमारत बांधल्याचा दावा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ सदरात नव्या संसद इमारतीबाबत भाष्य केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊतांनी काही दावे केले. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, नवे संसद भवन केवळ मेगा शो आहे. हे किती स्टारचे हॉटेल आहे, हे मला माहीत नाही. मी जेव्हा नव्या संसदेतून गेलो, तेव्हा मला ऐतिहासिक इमारतीतून जातोय, असे वाटलेच नाही. मी जेव्हा जुन्या संसद भवनातून जायचो, तेव्हा वाटायचे की, आपल्यासोबत इतिहास चालत आहे. मात्र नव्या संसदेत ना इतिहास आहे, ना काही वर्तमान आहे. सध्याचे संसद भवन आणखी किमान ५० ते १०० वर्षे मजबुतीने उभे राहील. असे असताना नव्या संसद भवनाचा घाईघाईने केलेला हा अट्टाहास कशासाठी? याबाबत दिल्लीतील वर्तुळात ज्या चर्चा सुरू आहेत त्या मनोरंजक आहेत.

केंद्रातील सरकार हे अंधश्रद्धा व अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह, कुंडलीचा पगडा आहे. सध्याचे संसद भवन १० वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही. १० वर्षांपेक्षा जास्त काळ येथे कोणी टिकत नाही. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी करा, असा ज्योतिषी सल्ला मानून नव्या संसद भवनाची उभारणी २०२४ च्या आधी केली. नवी वास्तू गोमुखी असावी, असा त्या ज्योतिषाचार्याचा आग्रह होता. त्यानुसार नवी वास्तू झाली, असा दावा संजय राऊत यांनी आपल्या लेखात केला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम