ठाकरे गटाच्या तीन नेत्यावारोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा माझ्या बापाने लिहिला आहे, मी कायद्याचा आदर करणारच अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच राजकीय नकला राज ठाकरेही करतात आणि सत्य बोलणे गुन्हा असेल तर आहोत आम्ही गुन्हेगार आहोत, असेही अंधारे म्हणाले.

नेमकं काय घडलं
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन गटांत हाणामारी होईल, या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोपही या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अंधारे, जाधव व राऊत त्यांच्यावर कलम 153, 500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, कलम 500 ,504 अंतर्गत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

कायदा माझ्या बापाने लिहिलाय
कायदा माझ्या बापाने लिहिला आहे, मी कायद्याचा आदर करणारच अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच राजकीय नकला राज ठाकरेही करतात आणि सत्य बोलणे गुन्हा असेल तर आहोत आम्ही गुन्हेगार आहोत. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला अजिबात आश्चर्य वगैरे काहीच वाटलं नाही. मी या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली प्रीपेड होतेच. हे सगळं अपेक्षित आहे. मला नोटीस आली तर नक्की जाईन असंही अंधारे म्हणाल्या. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना अशा प्रकारेच दंड शाही दाखवली जाईल. 153 अ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून, माझ्याकडे अजूनही रीतसर प्रत आली नाही. मी जे केलं ते नक्कल नाही. मोदीजींनी जे सांगितलं तेच मी माझ्या भाषणात बोलले. राज ठाकरे माझ्यापेक्षा जास्त अशा नकला करतात असं म्हणत अंधारे यांनी भाषणाबाबत खुलासा केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम