देवगिरी महाविद्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे मराठी विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्ताने अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा या उपक्रमांतर्गत काव्यवाचन, कथाकथन, निबंध, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व या स्पर्धेचे तसेच विविध गुणदर्शन व सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १२ ते १६ सप्टेंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या उपक्रमाच्या परितोषिक वितरण दि. १६.०९.२०२२* रोजी म.शि.प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे जेष्ठ सदस्य पंडितराव हर्षे हे होते. विचार मंचावर म.शि.प्र. मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, विवेक भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, मराठी विभागप्रमुख तथा संयोजक श्रीमती डॉ. समिता जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एन.जी. गायकवाड, उपप्राचार्य श्री. सुरेश लिपाने, उपप्राचार्य श्री. विजय नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी हा सर्वांगीण बनतो तो विद्यार्थीदशेतच. त्याचे विचार केवळ महाविद्यालयीन पातळीवर न राहता ते प्रत्येक क्षेत्रात पोहचले पाहिजे. मराठवाडयात देखील बौद्धिक क्षमता असलेले विद्यार्थी आहेत. आता महाराष्ट्र राज्यातून शिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यात येत आहेत. १९४८ साली जेव्हा मराठवाडा मुक्त झाला तेव्हा या लढ्यात विद्यर्थी ही मोठया संख्याने सहभाग घेत होते. मराठवाड्याच्या विकासात देखील विद्यार्थी सहभागी होते. कोणतीही चळवळ व क्रांती त्यांच्या शिवाय यशस्वी होत नाही म्हणून विद्यार्थी हा चळवळ व क्रांतीचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन बक्षीस वितरण प्रसंगी म.शि.प्र. मंडळाचे सरचिटणीस मा.आ. सतीश चव्हाण यांनी केले. या वेळी विजेत्या विद्यार्थ्याना परितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक डॉ. समिता जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. गणेश राठोड यांनी केले. आभार डॉ. मारोती गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वीणा माळी, डॉ. मथुरा मेवाड, प्रा. सचिन मुंडे, प्रा. सखाराम शिंदे, प्रा. गणराज म्हस्के, प्रा. समाधान खलसे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम