जामनेर मध्ये गणपती विसर्जनावेळी एका गणेश भक्ता ने गमावला जीव 

बातमी शेअर करा...

जामनेर मध्ये कांग नदी पात्रात जामनेर – बोदवड रस्त्यावरील पुलाजवळ दुपारी दीड वा. च्या सुमारास गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका गणेश भक्ता ने एक लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून त्या ने पाण्यात उडी घेऊन लहान मुलाचा जीव वाचवला. परंतु दुर्दैवाने त्या तरुणास आपला जीव गमावला.

सविस्तर वृत्त असे की, जामनेर येथे कांग नदी पात्रात जामनेर –  बोदवड रस्त्यावरील पुलाजवळ दुपारी दीड वा. च्या सुमारास गणपती विसर्जनासाठी गेलेल्या  किशोर राजू माळी वय. 27 रा. गणेशवाडी जामनेर लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन लहान मुलाचा जीव वाचवला परंतु दुर्दैवाने त्या तरुणास आपला जीव गमावला असून त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आई – वडील लहान भाऊ असा छोटा परिवार असून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.जामनेर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम