या राज्यातील मुलीने १९ व्या वर्षी पटकविला मिस इंडिया २०२३ चा किताब !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ । देशात फेमिना मिस इंडिया २०२३ ची नुकतीच घोषणा झाली आहे. राजस्थानच्या नंदिनी गुप्ताची मिस इंडिया २०२३ विजेती म्हणून निवड झाली. तर दिल्लीची श्रेया पुंजा ही पहिली उपविजेती ठरली. आणि मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांगला द्वितीय उपविजेतेपद देण्यात आले. नंदिनी गुप्ता हिला मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टीने मुकूट घातला.

१९ वर्षीय नंदिनी ही कोटा शहरातून आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे कि कोटा हे इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठे कोचिंग हब आहे. ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. नंदिनी कायम नवनवीन आव्हाने स्वीकारून प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी उत्सुक असलेली मुलगी आहे

मिस इंडिया 2023 चा ग्रँड फिनाले इंफाळ, मणिपूर येथे झाला. यामध्ये अनन्या पांडे ते कार्तिक आर्यन, नेहा धुपिया अशा बॉलिवूड स्टार्सचा सहभाग होता. अखेर या स्पर्धेत नंदिनी गुप्ताने बाजी मारली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम