श्री सदस्य पैसे घेवून आलेले नाही ; शिंदे गटाचा दावा !
दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ । ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने आज १६ रोजी गौरविले जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.
या सोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कवर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणालेत. त्याचबरोबर गोगावले यांनी श्री सदस्य हे पैसे देऊन आलेले नाहीत, ते त्यांच्या पैसांनी येथे आले आहेत. कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी स्वयंसेवक हे पोलिसांना मदत करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम