गोंडगाव येथे असंख्य महिला आणि पुरुष शिवसेना (उबाठा) पक्षात भव्य प्रवेश सोहळा संपन्न

वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर दाखवलं विश्वास

बातमी शेअर करा...

भडगाव: प्रतिनिधी

तालुक्यातील गोंडगाव येथे असंख्य कार्यकर्त्यांचा व महिलांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश झाला, दिनांक 22/11/2023 बुधवार रोजी गोंडगाव येथे झालेल्या भव्य आणि दिव्य कार्यक्रमात आरोग्य दूत विजय साळुंखे सह गावातील शेकडो कार्यकर्ते व महिलांसह माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून जळगाव जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने आणि सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील भडगाव, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे पाचोरा, तालुकाप्रमुख अनिल पाटील, नगरसेवक गणेश अण्णा परदेशी, रतन परदेसी, मनोहर चौधरी,शहर प्रमुख शंकर मारवाडी, जे.के.पाटील, मच्छिंद्र पाटील, गोरख पाटील, अरूण पाटील, शाम पाटील, भैय्या पाटील पांढरद, भाऊसाहेब पाटील, अण्णा चौधरी, मनोहर महाले उपजिल्हाधिकारी संदीप जैन माधव जगताप चेतन पाटील, पप्पू पाटील कोठली, भालचंद्र पाटील सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते गावातील ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ मंडळी यांनी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले व पक्ष प्रवेश जोरात व उत्साहात संपन्न झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम