मनोज पाटलांचे उपमुख्यमंत्र्यांना उत्तर : तुम्ही तुमच्या माणसाला आवरा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत असतांना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना रोखठोक उत्तर दिले आहे तर त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला देखील थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही तुमच्या माणसाला आवरा. तुमचा माणूस गप्प बसला तर आम्ही पण आमच्यात बदल करू असे मनोज जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही तुमच्या माणसाला गप्प केले तर आम्हीही आमच्यात बदल करू अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. त्यांचाच माणूस जर धडाधड बोलायला लागला तर आमच्याकडून का अपेक्षा करता? आधी तुम्ही तुमच्या माणसाला आवरा.. तुमच्या माणसाने आम्हाला बोलायची गरज नव्हती. आम्ही १०- १५ दिवस काहीच बोललो नव्हतो. तुमच्या माणसाने विनाकारण जातीय तेढ निर्माण होतील असे विधान केले आणि वातावरण दूषित केले. आम्ही बोललो तर तुम्हाला वाईट का वाटते? तुमचा माणूस बोलतो तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटत का? तुम्ही तुमच्या माणसाला सांगावे, ते गप्प बसले तर आम्हीही आमच्यात बदल करू.

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडण्यात आले. यावर बोलताना जरांगे म्हणाले, “मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे. होर्डिंग फाडल्याने काही होणार नाही. मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे?, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे. अंबडमध्ये ओबीसी सभा झाली, मात्र आम्ही एकही कुणाचं बॅनर फाडले नाही. होर्डिंग फाडल्याने आरक्षण घेण्यापासून लोकांना रोखता येणार आहे का?, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले पाहिजे. फडणवीस यांनी त्यांना थांबवला पाहिजे. होर्डिंग फाडणाऱ्यांना बहुतेक सरकारनेच पाठबळ दिले असेल,” असेही जरांगे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम