आ.लंके २२ तासापासून बसले उपोषणास ; अनेक गावे आज बंद

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे महामार्गांच्या दुरुस्तीसाठी उपोषण सुरु केले असून दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू होते. गेल्या 22 तासापासून लंके अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. अहमदनगर -पाथर्डी -नांदेड निर्मळ, अहमदनगर- राहुरी-कोल्हार-शिर्डी- कोपरगाव, नगर- मिरजगाव -चापडगाव- करमाळा -भुणी, नगर- पाथर्डी- शेवगाव या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवार (7 डिसेंबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही लंके यांचे उपोषण सुरूच होते.
गेल्या 22 तासापासून लंके यांचे उपोषण सुरू असून, महामार्गांच्या दुरुस्तीसाठी लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे गुरुवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.

पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी शहर,खरवंडी, मीडसांगवी, करंजी ही प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांसह अनेक गावांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. असे उपोषणाला बसलेले जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. उपोषणाची प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नाही शिवाय वैद्यकीय पथक देखील तपासणीसाठी आले नाही याबद्दल उपोषणकर्ते अॅड. हरिहर गर्जे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गावागावात लोक स्वतःहून व्यवसाय व व्यवहार बंद ठेवून या उपोषणाला पाठिंबा देत आहेत असे राजाभाऊ दौंड यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम