अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विजयी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपचे पारडे आता विजयाच्या दिशेने असल्याचे निश्चित झाल्यानंतर देशातील विविध ठिकाणी भाजपने जल्लोष साजरा केला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण निवडणुकीत चर्चेत असलेले टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाची पत्नी सुद्धा या निवडणुकीत विजयी झाली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत उत्तर जामनगर विधानसभा मतदार संघ या वेळी जास्तच चर्चेत होता. भाजपने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली होती. रिबावा रवींद्र जडेजा आता विजयी झाल्या आहेत. त्यांनी 55,341 मते मिळवत आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा परभव केला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 24,008 मते मिळाली.
त्यामुळे रिवाबा जडेज्या यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे. याबरोबरच सरकार स्थापनेत त्यांना मंत्रिपदाची ऑफर देखील दिली जाऊ शकते. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात रिवाबा यांनी विजय खेचून आणला.रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयना जडेजा काँग्रेसमध्ये आहेत. जामनगर उत्तरमधून त्या काँग्रेसच्या तिकीटाच्या दावेदार होत्या, पण पक्षाने बिपेंद्रसिंग जडेजा यांना तिकीट दिले. तरी देखील नयना यांनी बिपेंद्र सिंग यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे जडेजा यांच्या घरातूनच दोन वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करण्यात येत होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम