हवामानात मोठा बदल ; या भागात होणार वादळी पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून हवामानात मोठा बदल होत असतांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. दरम्यान या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र याभागात जोेरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दमट हवामान झाल्याने उकाडा वाढल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे जाणवत आहे.

राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचबरोबर मागच्या 24 तासांत अकोला येथे राज्यातील उच्चांकी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा 15 ते 27 अंशांच्या दरम्यान होता.

उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 36.8 (17.5), जळगाव 38.5 (20), धुळे 38 (17), कोल्हापूर 36.7 (22.7), महाबळेश्‍वर 31.5 (18.1), नाशिक 35.2 (19.3), निफाड 35.5(15.1), सांगली 37.6 (23.5, सातारा 36.2(21.3), सोलापूर 40.3 (25.1), रत्नागिरी 32.3 (22.5), छत्रपती संभाजीनगर 37.2 (20.4), नांदेड 38 (24.2), परभणी 39.1 (24.1), अकोला 40.4 (22.8), अमरावती 38.8 (23), बुलडाणा 38 (24), ब्रह्मपुरी 4.2 (24.4), चंद्रपूर 40.2 (25.4), गडचिरोली 35.8 (20.4), गोंदिया 38.2 (22.7), नागपूर 38.6 (23.5), वर्धा 40 (26.8), यवतमाळ 38.7 (24.7) तापमानाची नोंद झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम