गौतमीला सोडवा लागला स्टेज ; ती ठरली वरचढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ ।  राज्यातील अनेक तरुणाच्या ओठावर गौतमी पाटीलचे नाव आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’, असं म्हणत लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर हवा झाली आहे. अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते लहानसहान खेडोपाड्यांपर्यंत तिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तोबा गर्दी करत आहेत. मात्र, आता गौतमीवर तिची सहकारीच भारी पडल्याचं दिसून येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर गौतमीच्या रद्द झालेल्या कार्यक्रमाची चर्चा होत आहे. शिरुरमध्ये गौतमीचा शो रद्द करुन तिची सहकारी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या अन्नापूर येथे गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, शिरुर पोलिसांनी ऐनवेळी या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना गौतमीचा कार्यक्रम ताबडतोब रद्द करावा लागला. इतकंच नाही तर, गौतमीऐवजी तिची सहकारी हिंदवी पाटील हिच्या कार्यक्रमाचं ऐनवेळी आयोजन केलं. दरम्यान, या कार्यक्रमासाठी गौतमीने मोठी फी आकारली होती. मात्र, तरीदेखील तिला परफॉर्म करता आलं नाही. पर्यायाने हिंदवीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे आता गौतमीवर हिंदवी भारी पडतीये की काय? अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम