बॉलिवूडवर दुखाचा डोंगर ; दिग्गज अभिनेत्याचे निधन !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज अभिनेते व अभिनेत्रीच्या दुखद निधनाच्या घटना एकापोठापाठ एक घडत असतांना गुरुवारी बॉलिवूड अभिनेता रिओ कपाडिया यांचे निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोवर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनील श्रॉफ हे आजारी होते. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटामध्ये त्यांनी ‘खिलाडी’ अक्षय कुमारसोबत काम केले होते.

सुनील श्रॉफ यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यांनी दिवाना, द्रोह काल, अंधा युद्ध, तथास्तु यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळं स्थान निर्माण केले होते. त्यांचा सिनेसृष्टीपर्यंचा प्रवास खूपच खडतर होता. सुनील श्रॉफ यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट होते. ते सोशल मीडियावर सक्रीय देखील असायचे. इन्स्टावर ते नेहमी पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत फोटो शेअर केला होता. ते नेहमी आपल्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत इन्स्टा पोस्ट करत चाहत्यांना माहिती द्यायचे.

सुनील श्रॉफ यांनी फक्च चित्रपटच नाही तर अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट १७ ऑगस्ट २०२२ ला शेअर केली होती. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते ईदवर आधारित सलमान खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसले होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम