भरधाव कारची कंटेनरला धडक ; एक ठार तीन सुखरूप !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | राज्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत कारमधील अन्य तिघे जण सुखरुप असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज पहाटेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा आश्रमशाळा व राजधानी हॉटेल परिसरात हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार गुजरातच्या दिशेने निघाली हाेती. या महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमधील तिघे जण सुखरुप असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. यामध्ये कार चालकाची पत्नी व दोन मुलांचा समावेश आहे. कार चालकाचा मृतदेह कासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरु केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम