राज्यात नव्या वादाला फुटले तोंड ; शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । राज्यात आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापलं आहे. अशातच आता लोढा यांनी केलेलं वक्तव्य राज्यात नव्या वादाचं कारण ठरत आहे.

शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे बाहेल पडले असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एका घटनेशी तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. ज्यामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम