आसामविरुद्ध ऋतुराजचे झंझावती शतक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात 7 षटकार लगावत द्विशतक झळकावले होते. तर विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये ऋतुराज गायकवाडची चांगली कामगिरी सुरूच आहे. सलग दुसऱ्या लढतीत त्याने आसामविरुद्ध 114 च्या स्ट्राईक रेटने झंझावती शतक केले आहे.

महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने उपांत्यपूर्व फेरीत 220 धावांची खेळी केली. त्याचवेळी आसामविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 168 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. गायकवाडने आपल्या खेळीत 18 चौकार आणि 6 षटकार मारले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 168 धावांच्या खेळीसह ऋतुराज गायकवाडने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए च्या इतिहासात गायकवाड हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. ज्याची या फॉरमॅटमध्ये फलंदाजीची सरासरी 60 पेक्षा जास्त आहे.

दुसरीकडे विजय हजार ट्रॉफीमधील गायकवाडच्या शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली तर त्याने 7 शतके झळकावली आहेत. त्यात द्विशतकाचाही समावेश आहे. ऋतुराज गायकवाडने उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध द्विशतक झळकावले. त्या सामन्यात त्याने 159 चेंडूत 220 धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. या सामन्यात त्याने आपले द्विशतक अतिशय खास पद्धतीने पूर्ण केले. वास्तविक, त्याने 49 व्या षटकात सलग 7 षटकार मारून आपले द्विशतक पूर्ण केले होते. उपांत्य फेरीतही त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आणि आसामविरुद्ध 168 धावांचे शतक झळकावले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम