नवा वाद पेटला : पुतण्याची काकांवर जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  राज्यात आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आज बैठक घेण्यात आली यावेळी शरद पवार गटापेक्षा अजित पवारांकडे जास्तीचं संख्याबळ असल्याचं दिसून येत आहे. यावेळी बोलतांना अजित पवारांनी थेट शरद पवारांवर हल्ला केला. २००४ मध्ये हातचं मुख्यमंत्रीपद डावलल्यापासून ते मागच्या वर्षी शिंदेंनी शपथ घेण्यापूर्वीच भाजपशी सुरु असेलली बोलणी; इथपर्यंतचं सगळा इतिहास अजित पवारांनी बोलून दाखवला.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलो आहे. ७७ ला देशपातळीवर निवडून आलेला जनसंघ पक्ष आता कुठंय? शोधावा लागतोय. देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असते ती आज मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. पंचविशीपासून पंच्याहत्तीपर्यंत आपण योग्य काम करु शकतो, अंगात बळ असते, जिद्द असते. नंतर मात्र क्षमता कमी होतात.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना परदेशीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. २००४ला छगन भुजबळ आणि आर.आर. पाटील यांच्या नेृत्वाखाली पक्षाला मोठं यश मिळालं. सोनियांनी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याविषयी भूमिका घेतली होती. त्यावेळी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते होते. त्यावेळी चार खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यावेळी मुख्यमत्रीपद मिळालं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता. पवार पुढे म्हणाले, २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. नंतर आम्हांला फडणवीसांच्या शपथविधीला उपस्थित रहायला सांगितलं. मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. पुढे २०१७ मध्ये मीटिंग झाली होती. भाजपवाले म्हणाले २५ वर्षांचा आमचा पक्ष आहे सोडणार नाही. तेव्हाच युती तोडण्याचा प्लॅन झाल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ”२०१७ ला शिवसेनेला जातीयवादी म्हणाले आणि २०१९ला शिवसेनेसोबत गेले. २०१९मध्ये शिंदेंनी शपथ घेण्याअगोदर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरु होती. मी आणि वरिष्ठ नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करण्यासाठी निघालोही होतो” असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम