आम्ही त्यांची विचारधारा घेतली नाहीच ; रुपाली चाकणकर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षात मोठी फुट पाडली. परंतु रुपाली पाटील चाकणकर यांनी आज केलेलं विधान खळबळजनक आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर युती केलीय’ असं स्पष्टीकरण चाकणकरांनी दिलं.

अजित पवार गटाने सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर तटकरे यांनी पक्षसंघटनेत मोठे बदल केले. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद दिलं आहे. त्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षही आहेत. आज बैठकीसाठी रुपाली चाकणकर पोहोचल्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चाकणकर म्हणाल्या की, हिंदुत्व मानणारी शिवसेना देखील यापूर्वी आमच्यासोबत होती. आता आम्ही जी युती केली आहे ती राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे. आम्ही त्यांची विचारधारा घेतलेली नाही. आमची भूमिका जी आधी होती तीच असेल, असं स्पष्टीकरण चाकणकरांनी दिलं. एकीकडे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदींचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत असतांना रुपाली चाकणकरांनी मात्र विचारधारा स्वीकारली नसल्याचं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी आणि चित्रा वाघ तुम्हाला एकत्र दिसलो का? असं म्हणून त्यांनी तो विषय टाळला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम