राज्यात नवा वाद : शिवसेनेच्या दिशेने झाले राष्ट्रवादीचे बंड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  राज्यातील राजकीय महाभूकंपादरम्यान अजित पवार यांनी सोमवारी मोठी खेळी करत शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करत सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. यासोबतच अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करताना अनिल पाटील हेच आमचे प्रतोद असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असतील असे अजित पवारांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय लागू नसेल असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आमच्या या निर्णयाला बहुसंख्येने पाठिंबा देण्यात आलेला आहे. लोकशाहीत बहुमताने घेतलेला निर्णय कुणीही अवैध ठरू शकत नाही. वाद व्हावा अशी आमची इच्छा नाही. पण अजितदादांनी सांगितल्यानुसार काही वाद झाल्यास त्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकते. मात्र वाद होऊ नये अशी आमचा मनापासून प्रयत्न असेल असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील व जितेंद्र आव्हाडांच्या अपात्रतेसाठी आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. 9 जणांवर कारवाई करावी असे मी मीडियात पाहिले. मी सांगू इच्छितो की, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विधीमंडळ पक्षनेता बनवले आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरवण्यासाठी मी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे असे पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील हे बंड आता शिवसेनेच्या वाटेनेच जात असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी कुणाची हा वाद सुरू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार पुढे काय भूमिका घेतात आणि आणखी काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम