पवारांची पहिली कारवाई : पटेल, तटकरे पक्षातून बडतर्फ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर त्याच दिवशी जे काही पक्षाचे नेते उपस्थित होते. त्यांच्यावर शरद पवारांनी पहिलीच कारवाई करीत अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढले आहे.

दरम्यान, यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. या मागणीला शरद पवारांनी मंजुरी दिली असून पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काल शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात सुरूवात झाली.

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली. शपथविधीनंतर अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र शरद पवार यांनी या सर्वांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत कारवाईला सुरूवात केली आहे. त्यानंतर आता पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. हा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्मारावबाबा अत्राम यांच्यावर ही कारवाई होणार आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम