शेअर बाजारात नवा विक्रम : निफ्टीने ओलांडला मोठा टप्पा !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३

देशात आज शेअर बाजारात नवा विक्रम झाला असून प्रमुख बाजार निर्देशांक नवीन विक्रमी उच्चांकावर उघडले. NSE निफ्टी प्रथमच 20,127 वर उघडला. त्याचप्रमाणे BSE सेन्सेक्सनेही 67,693 चा टप्पा गाठला. मेटल शेअर्स बाजाराच्या वाढीमध्ये आघाडीवर आहेत. यामध्ये टाटा स्टीलचा शेअर 2% वाढीसह टॉप गेनर आहे. तर एफएमसीजी क्षेत्रात विक्री होत आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास सर्व शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्येही प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम