देशातील ‘या’ राज्यात मिनी लॉकडाऊन लागू !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३ | देशात आणखी एका संसर्गाची लागण झाल्याने केरळ राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी याची माहिती दिली. राज्यातील एकाला निपाहची लागण झाली आहे. आतापर्यंत 5 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधीर आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. एका खासगी रूग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

केरळमध्ये प्राणघातक निपाह व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. एका ९ वर्षाचा मुलाला देखील संसर्ग झाला असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सरकारने मुलावर उपचार करण्यासाठी ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडी मागवली आहे. निपाह विषाणू संसर्गासाठी हा एकमेव अँटी-व्हायरल उपचार उपलब्ध आहे. मात्र अद्याप वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झालं नाही. निपाह मानवाकडून माणसात पसरतो आणि मृत्यू दर जास्त आहे. राज्यात दिसलेला विषाणूचा प्रकार हा बांगलादेशमध्ये आढळला होता.

वीणा जॉर्ज म्हणाल्या, “9 वर्षांचा मुलगा कोझिकोड येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) कडे मोनोक्लोनल अँटीबॉडीची मागणी केली आहे आणि ते लवकरच कोझिकोडला आणले जाईल.” जिल्हाधिकाऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत कोझिकोडमध्ये मोठ्या प्रमाणात जमणे टाळण्याचे आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे वीणा जॉर्ज यांनी सांगितले. बाधित आढळलेल्या परिसरात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनाच काम करण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम