दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ । अनेकांना डायबेटीजसारख्या अनेक विकार असतात पण त्याचे काही वेळेत लक्षण दिसून येतात तर काहीना उशीर होत असल्याने त्याचा समस्या मोठ्या होत असतात. डायबेटीजला स्लो पॉयझन मानले जाते. आजची बदलती जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि झोपेचे कमी झालेले प्रमाण, ताणतणाव यामुळे हा आजार घातक ठरू लागला आहे. त्यातच डायबेटीकचं एक नवीन लक्षण समोर आले आहे. त्यामुळे डायबेटीजपासून वेळीच सावध होऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहीजेत. एरव्हीच्या तहान लागणे, थकवा जाणवणे, लघवीला जास्त होणे या पलीकडचे हे नवीन लक्षण पाहून तुम्ही तातडीने पावले उचलायला हवीत तर काय आहे हे डायबेटीज ओळखण्याचे नवीन लक्षण पाहूया..
डायबेटीजची एक सर्वसामान्य स्थिती आहे, जी भारतात वेगाने पसरत आहे. या सर्व प्रकरणात टाइप – 2 चे डायबेटीजची प्रकरणे 90 टक्के आहेत. जर अचानक तुमच्या तोंडातून असामान्य वास येत असेल तर ही डायबेटीजची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. तुमच्या तोंडातून फळासारखा गोड वास येत असेल तर हे डायबिटीज किटोएसिडोसिसचे लक्षण असू असू शकते. आता हा वास तुमच्या शरीरात डायबिटीजचे सुरुवातीचे लक्षण असू शकतो.
वेटवॉचर्सच्या दाव्यानूसार डायबिटीज किटोएसिडोसिस शरीराच्या आतील एक गंभीर प्रक्रीया आहे, ज्यात इन्सुलिनच्या कमतरतेने रक्तात हानिकारक किटोन्स तयार होतात. आणि डायबिटीजचे असामान्य लक्षण आहे. असा दावा केला जात आहे की डायबिटीजने श्वासांना दुर्गंध देखील येऊ शकतो. कारण तोंडातील ग्लुकोज वाढल्याने हे होत आहे. कारण बॅक्टेरीया ही शर्करा अन्नाच्या स्वरुपात वापरीत असल्याने त्यामुळे संक्रमण होऊन हिरड्यांचा आजार होऊ शकतो. हिरड्यांचा आजार तोंडाच्या दुर्गंधीचा एक कारण असू शकतो.
वेटवॉचर्सने म्हटले आहे की श्वासातून जर फळांसारखा वास किंवा चव येत असेल तर तो डायबिटीज कीटोएसिडोसिस नावाच्या खतरनाक स्थितीचा संकेत असू शकतो. डायबिटीज कीटोएसिडोसिसचा पहिला संकेत म्हणून तुम्हाला टाईप – 1 डायबिटीज असू शकतो. आवश्यक इन्सूलिन शिवाय आपले शरीराला ग्लुकोजपासून पासून आवश्यक ऊर्जा नाही मिळत. यामुळे तो शरीरातील चरबीचा वापर करु लागतो आणि कीटोन्स नामक रसायन तयार करतो. जर तुमच्या शरीरातील रक्तात अधिक कीटोन्स जमत असतील तर आपल्या आरोग्याला धोका आहे. परंतू फळासारखा गंध किंवा वास येणे हे डायबिटीज कीटोएसिडोसिस ओळखण्याचे एकमेव लक्षण नाही. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्वचा लाल होऊ शकते किंवा उलट्या देखील होऊ शकतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम