काल अजित पवारांसोबत तर आज शरद पवारांसोबत ; या नेत्याने घेतली भूमिका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. तर काल पाठिंबा देणारे काही नेते आज शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत.

तर खासदार अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी मी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हंटलं आहे. अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्हिडिओ आणि दोन ओळी त्यांनी लिहल्या आहेत. अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम