एकाच महिन्यात वाहनांच्या खरेदीत विक्रमी वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ नोव्हेबर २०२३

सणासुदीच्या काळात जोरदार मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीने ऑक्टोबरमध्ये विक्रमी पातळी गाठली. ऑक्टोबरमध्ये किरकोळ विक्री गेल्या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यातील ३,३६,३३० वाहनांवरून १६ टक्क्यांनी वाढून ३,८९,७१४ वाहनांवर गेल्याचे वाहन उत्पादकांची संघटना सियामने शुक्रवारी ही माहिती दिली. तीनचाकी विभागात ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक पुरवठा ७६,९४० वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहने आणि तीनचाकी वाहनांची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झाली आहे. दुचाकी विभागाने ऑक्टोबरमध्ये चांगली विक्रीही नोंदवली. तिन्ही विभागांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली असून, ही वाढ उद्योगासाठी उत्साहवर्धक आहे. सरकारची अनुकूल धोरणे आणि सणासुदीमुळे हे शक्य झाले असे ते म्हणाले.

सियामच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी आणि क्वाड्रिसायकलचे एकूण उत्पादन २६, २१, २४८ युनिट इतके झाले होते. विशेषतः प्रवासी वाहन विभागाने वार्षिक आधारावर १५.०९ टक्के वाढ नोंदवली आहे. तीनचाकी वाहनांच्या विभागात ४२.१ टक्के वाढ झाली आहे. अग्रवाल म्हणाले मागील महिन्यात २०.१ टक्के वाढीसह १८. ९६ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये, सियामच्या आकडेवारीनुसार वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये प्रवेश पातळीवरील कारची विक्री ७५ टक्क्यांनी घसरून ३५ हजार युनिट्सवर आली आहे. तर मोटारसायकल आणि स्कूटरच्या विक्रीत अनुक्रमे ३९ टक्के आणि २५ टक्के घट झाली आहे. या वर्षी जून- सप्टेंबरमध्ये कमी पाऊस झाल्याचा परिणाम वाहन विक्रीवर झाला होता

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम