ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच स्वागताचे होर्डिग फाडले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ नोव्हेबर २०२३

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून शिंदे व ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे राजकारण सुरु आहे यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. मात्र, त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. ठाणेमधील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षांपासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेला भेट देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्रा येथे येत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा ते ठाणे या भागात मोठ्या प्रमाणात बॅनर्स, होर्डिंग्ज लावले होते. मात्र, हे सर्व होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या फाडलेल्या होर्डिंग्जचा व्हिडिओ ट्विट केला आहे. जवळपास 90 टक्के होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत, असा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. तसेच, पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

शिवसेनेची मध्यवर्ती शाखा बुलडोझरने पाडल्यानंतर या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे सायंकाळी 4 वाजता मुंब्रा येथे येत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे या शाखेची पाहणी करणार असून स्थानिक व मुंब्रावासीयांशी संवाद साधणार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत व खासदार राजन विचारे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम