आ.रोहित पवारांचा नवा फंडा : आता काढणार युवक संघर्ष पदयात्रा

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या आरोपाच्या फैरीमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाकडे कोणत्याही नेत्याला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या घडीला राज्यात लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र राज्य सरकार भरती न करता खासगीकरणाचा घाट घालत आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणी हवालदिल झाले आहेत.

त्याचबरोबर एमआयडीसी भरती, पशुसंवर्धन विभाग भरती, आरोग्य विभागातील विविध पदांची भरती रखडली आहे. या सर्वच प्रश्नांवर राज्य सरकारला जागे करण्यासाठी तरुणांना घेऊन पुणे ते नागपूर अशी युवक संघर्ष पदयात्रा काढून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केली आहे. येत्या दसऱ्यापासून म्हणजे मंगळवार, २४ ऑक्टोबरपासून या पदयात्रेला पुण्यातून सुरुवात होणार आहे. ४०-४५ दिवसांनंतर हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम