अखेर शिंदेंचे खा.हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३

राज्यातील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू झाल्यामुळे काल मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात जात परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडूनच (डीन) चक्क शौचालय साफ करवून घेतले होते. मात्र, आता या प्रकरणावरुन खासदार हेमंत पाटील यांच्यावर अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली आहे.

नांदेड शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूवरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळातही उमटल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांना तिथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसेल. हे पाहून हेमंत पाटील हे चांगलेच संतापले. त्यांनी चक्क रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) शौचालय साफ करायला लावले. इतकेच नाही तर त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. हेमंत पाटील यांना रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले. रुग्णालयातील स्वच्छतागृह अतिशय घाणेरड्या स्थितीत होते. अनेक शौचालय ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील सामान ठेवलेले होते. त्यामुळे हेमंत पाटील चांगलेच संतापले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम