महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला अचानक पेट

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३

देशभर दिवाळीचा सण साजरा होत असतांना बुलढाणा जिल्ह्यात एका चालत्या ट्रकने पेट घेतल्याने बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर नांदुरा तालुक्यातील वडी गावा नजिक चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्को ट्रान्सपोर्ट कंपनीचा हा ट्रक अकोलाकडे जात होता. अचानक या ट्रकमधील साहित्याला आग लागली आणि बघता बघता हा ट्रक आगीच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या ट्रकमधील साहित्याची मोठी वित्तहानी झाली आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन स्वतःचे प्राण वाचवले आहे. यात ट्रक जळून खाक झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम