सलमानच्या चाहत्यांचा धिंगाणा : थेट चित्रपटगृहात फोडले फटाके !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३

देशभर दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात सुरु आहे तर दुसरीकडे नुकताच सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला. सलमान खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हा चित्रपट पाहण्यासाठी राज्यभरातील थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये मालेगावमध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी हुल्लडबाडी करत थिएटरमध्येच फटाके फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगावातील चित्रपटगृहामध्ये सलमान खानचा टायगर ३ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. अशातच थिएटरमध्ये काही टवाळखोरांनी हुल्लडबाजी करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केल्याची घटना घडली. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात ही घटना घडली. चित्रपट पाहताना टायगरची एन्ट्री होताच काही टवाळखोरांनी थेट थिएटरमध्ये फटाके फोडून गोंधळ घातला.

ही घटना रविवारी रात्री घडली. टायगर ३ चा हा शो रात्री ९ ते १२ वाजेपर्यंतचा होता. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर टायगरची म्हणजे सलमान खानची धांसू एन्ट्री होते. त्यातच चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही टवाळखोरांनी थिएटरमध्ये मोठ-मोठे फटाके फोडले. यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या इतर प्रेक्षकांचा एकच गोंधळ उडाला. थिएटरमध्ये प्रेक्षकांची पळापळ झाली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम