राष्ट्रवादीच्या मिटकरींची तिखट टीका; काळ्या टोपीखाली…
दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत असते. काही दिवसांपूर्वीही मुंबईबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद झाला होता.
मात्र आज देखील एक वादग्रस्त विधान करून वाद ओढावला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त विधान करण्यात पटाईत आहेत. त्यांनी मागील काळात अनेक महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधाने केले आहेत, मात्र त्यावर त्यांनी माफी मागितली नाही.
आज परत वादग्रस्त विधान केलं आहे, तर पुढे म्हणाले राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू आहे” अशी तिखट टीका मिटकरी यांनी राज्यपालांवर केली आहे. तर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना कोश्यारी महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटल आहे. आणि राज्यपालांना सल्ला दिला आहे की तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगावर आणि गड किल्ल्यांवर फिरा म्हणजे तुम्हाला कळतील छ.शिवाजी महाराज, उगाच उठून जिभ टाळ्याला लावायचे धंदे बंद करा” अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम