सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन का मिळत होती ? पटोले

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ राज्यात कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा येवून गेली यावेळी राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले होते त्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक होत त्यांचे राज्यात आंदोलन झाले त्यानंतर आता राज्यात हा वाद वाढत चालला असल्याचे चिन्ह दिसत आहे. यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युतर दिले आहे.

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांनी सावरकरांना ब्रिटिशांकडून ६० रुपये पेन्शन का मिळत होते, हे आधी स्पष्ट करावे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली आणि भीतीपोटी त्यांनी इंग्रजांना दयेचा अर्ज लिहिला, असा दावा राहुल यांनी केला होता.

दरम्यान आपण सावरकर यांच्याविषयी जे काही बोललो ते पुराव्यानिशी बोललो. सावरकर यांच्याविषयी भाजपला जे वाटते ते म्हणणे त्यांनी मांडावे. त्याला आमचा विरोध नाही. संविधानाने सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. आमचा मार्ग अहिंसेचा आहे. आम्हाला कोणाला दबावात ठेवायचे नाही. ‘भारत जोडो’ यात्रेचा उद्देशच द्वेषाच्या विरोधात आहे,’’ असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम