नाना पटोले यांना मतदार संघात धक्का : कमळ फुललणार

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यातील ग्रामपंचायतीत विदर्भामध्ये भापज आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसलेला आहे. राज्यातील १०७९ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. यापूर्वीच ८७ ग्रामपंचायतींवर सरपंचांची बिनविरोध निवड झालेली आहे.

राज्यातील १८ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी काल मतदान पार पडले असून ८६ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडला गेला. तर उरलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. तर यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विदर्भामध्ये भाजप आघाडीवर आहे. चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघात तब्बल १५ ठिकाणी भाजप लीड करत असल्याची माहिती आहे. तर काँग्रस ७ ते ८ ठिकाणी पुढे असून तीन ठिकाणी इतरांना सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम