
सोन्याच्या दरात किरकोळ घसरण !
दै. बातमीदार । ६ एप्रिल २०२३ । राज्यात लग्नाचा बार उडण्याची सर्व दूर तयारी सुरु आहे. लग्न म्हणले कि सोन्यासह चांदीचे दागिने आलेच हे दागिने घेण्यासाठी बाजारात अनेक लोक येत आहे. सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरु आहे. सोन्याच्या किंमती बुधवारी 62 हजारांच्या जवळ पोहोचल्या होत्या. दरम्यान आज सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सोन्याच्या भाव 206 रुपयांनी घसरला आहे. यासह सोनं आज 6,575 रुपयांवर व्यवहार करत आहे. 5 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याचे भाव 60,781 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या भावामध्येही किरकोळ तेजी पाहायला मिळते. चांदीचा रेट 131 रुपयांनी वाढून 73,965 रुपयांवर आहे. 22 कॅरेट गोल्ड 188 रुपयांनी घसरुन 55,487 रुपयांवर व्यवहार करत आहे. एक्सपर्टनुसार, सोन्याचा भाव यावर्षी 65 हजारांच्या जवळपास जाऊ शकतो.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम