जम्मू-काश्मीरात जवानांची गाडी कोसळली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ । देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात एक गाडी रविवारी सकाळी सिंध नदीत कोसळली. या गाडीतून सीआरपीएफचे जवान प्रवास करत होते. अपघातात ८ जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात होते.

तेव्हा ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढलं आहे. बालटाल इथल्या बेस शिबिराच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. गांदरबलच्या बटाल भागात नीलग्रार हेलिपॅडजवळ गाडी सिंध नदीत कोसळली.अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

अमरानथ यात्रेचा काळ वगळता इतर दिवशीही सुरक्षा व्यवस्था तैनात असते. आमचे प्राधान्य लोकांची सुरक्षा आहे. स्थानिकांकडूनही यासाठी चांगली मदत मिळते असं सीआरपीएफने म्हटलंय. हिमालयात ३ हजार 888 मीटर उंचीवर गुहेत मंदिर असून वर्षात ६२ दिवसांची वार्षिक तीर्थयात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफकडे अद्ययावत अशी सुरक्षा साधने आहेत आणि काश्मीरच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी याची मदत होते. सीआरपीएफच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातील सर्व दिवस आम्ही सुरक्षेत तैनात असतो. यात्रा असो किंवा नसो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर तैनात जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम