पावसाठी अधिवेशनातून जनतेला काय मिळणार ? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिले उत्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जुलै २०२३ ।  राज्यात तीन पक्षाचे सरकार आले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवारांसह सर्वच मंत्रीसह आमदार शरद पवारांची भेट घेतली आहे. यावर पवार शांत होते असे नेत्यांनी प्रतिक्रियेत सांगितले आहे तर महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश उद्यापासून मुंबई येथे सुरू होत आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याने विरोधकांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यावरून धारेवर धरणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आगामी अधिवेशनातून राज्याला काय मिळणार या प्रश्नाला ठाकरे स्टाइलने उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक घरात संतापाचे वातावरण आहे महाराष्ट्रात मागचे दीड ते दोन वर्षे जे राजकारण सुरू आहे, ते फार संतापजनक आणि घाणेरडं राजकारण आहे. हे याआधी कधीही घडलं नव्हतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे. मला आश्चर्य वाटत नाही की यांच्या ज्या तडजोडी चालत असतात, एकमेकांसोबत भांडून पुन्हा एकत्र येतात. जे झालं ते झालं पण भविष्यात ज्यांना राजकारणात यायंचं त्यां भविष्यातील पिढ्यांसोमर ताटात वाढलंय, ते कोणत्या प्रकारचं राजकारण करणार? त्यांना जर हेच राजकारण असतं असं वाटायला लागलं तर महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल? याचा विचार न करता सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण करणं घाणेरडं आहे असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान यावेळी उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाठी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी ‘घंटा’ असं एका शब्दात उत्तर दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशन मुंबईत १५ दिवस सुरू राहणार असून या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम